Tuesday, January 22, 2008

TRINGALWADI FORT Written by Hanumant @ 9881907177

TRINGALWADI FORT Trek
Organized by SHRI SIDDHESHWAR TREKKING CLUB

Dear Adventure Lovers & Trekkers

DATE: 17th February 2008 (Sunday)

REPORTING:
Date & Timing: 17th February 2008 on 7.00am. Sunday
Place: Nashik ST Stand Platform No 1. Old CST Nashik

For More Details & Registration:
SOMNATH KSHIRSAGAR @ 9420225203 (Nashik)
HANUMANT CHAUNDKNAR @ 9881907177 (Pune)
Or mail us your queries at: Click Here or shrisiddheshwartrekkingclub@gmail.com

Type: Hill Fort
Height: 3238 Feet above MSL
Grade: Easy
District: Nashik
Region: Igatpuri
Base Village: Tringalwadi

Tringalwadi Fort:
This fort, with its weird and unlikely name, is located at a distance of about 7kms from Igatpuri. A small yet magnificent fort, Tringalwadi still has most of its stone structure standing.The door leading to the fort is intricately carved with the images of gods and goddesses.The fort also offers one the opportunity to explore some ‘Secret Doors/Routes’ from the fort. Pandav Leni: Another attraction of this fort is the ‘Jain Caves’ which unfortunately are lying in ruins.The entire periphery of the hillock is lined with caves of different shapes and sizes which are worth exploring.

Nearest Spot: Pandav Leni

Route:
Nashik - Ghoti - Igatpuri - Tringalwadi - Fort
Mumbai - Kalyan - Igatpuri - Tringalwadi - Fort

Marathi:
त्रिंगाळवाडी त्रिंगाळवाडीला जाण्यासाठी मुंबईहून सकाळची तपोवन एक्‍स्प्रेस पकडून नऊच्या सुमारास इगतपुरी गावातूनच सुरू होते. गावातल्याच कुणालातरी दिशा विचारल्यास जास्त चांगले. उत्तर दिशेला सुमारे पाऊण तास कच्च्या रस्त्याने मार्गक्रमणा केल्यानंतर एक खिंड लागते. वाटेत डाव्या बाजूला विपश्‍यना मंदिराचा रम्य परिसर आणि उजव्या दिशेला मातीचे धरण दिसते. खिंडीमध्ये स प्तश्रुंगी मातेचे चांगल्यापैकी बांधलेले मंदिर आहे. खिंडपार करून सुमारे वीसेक मिनिटांची चाल झाल्यावर आपण त्रिंगळवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोचतो. इथून गाव २ किलोमीटर आहे. नाक्‍यावरून उजवीकडे न जर फिरवली तर बुध्या डोंगर आणि समोर वाळविहीर डोंगर दिसतात. डावीकडे दिसतो तो त्रिंगळवाडी किल्ला. गावात पोचायला पावणेअकरा वाजले. गाव मागे टाकून लगतच्या त्रिंगळवाडी धरणातले पाणी पिऊन ताजेतवाने होऊन सर्वजण गडाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं. साधारण चढ असलेली पाऊणतासाची मळलेली पायवाट पठारावर घेऊन जाते. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली लेणी पाहायची असली तर पंधराएक मिनिटात उजव्या बाजूने उतरून जाता येतं. लेणी ती भागांत आहेत. बाहेर ओसली, आत विहार आणि विहारात खोदलेले कोनाडे. आत भगवान महावीराची मूर्ती शिरविरहीत धड अशा अवस्थेत आहे. या लेण्यांचा वापर अगदी अलिकडे गावगोळा म्हणून केला जायचा. पठारावरून किल्ल्याच्या दिशेने चढणीला लागल्यावर वीसेक मिनिटात किल्ल्याखालच्या कातळभिंतीला पोचतो. इथून डाव्या बाजूने चालत राहिल्यावर दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात. पायऱ्या अतिशय चांगल्या अवस्थेत आहेत. खरं म्हणजे गडावर पोचायला उजव्या बाजूनेही चांगली वाट आहे. पण डावीकडची ही वाट, वर लागणारे उत्तम अवस्थेत आजही असलेले प्रवेशद्वार आणि समोर कातळात कोरलेला मारुती याकडे घेऊन जाते. हे पाहून येण्या-जाण्याचा हाच प्रस्थापित मार्ग असावा असं वाटतं. प्रवेशद्वारातून समोर दिसणाऱ्या मोठ्या खडकावरून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला वळलं की वाड्याचे पडके अवशेष, पाण्याची दोन चार टाकी व दक्षिणोत्तर पसरलेली टेकडी दिसते. इथपर्यंत पोहोचताना जेवायची वेळ झालेली दिसते. तासभर भोजन व विश्रांती आणि गप्पा झाल्यावर जवळच्याच शंकर-पार्वती-गणेश असं सहकुटुंब असलेल्या मंदिरात सर् वांनी दर्श घ्यायचं. टेकडीवर चढून आसपासचा रम्य परिसर न्याहाळून घ्यायचा आणि दक्षिणेस तळेगड, इगतपुरी, पूर्वेला कळसूबाई रांग, उत्तरेला त्र्यंबक रांग असा नकाशा न्याहाळायचा. उतरायला लागलं की दहा मिनिटा तच पठार लागते. इथून आल्या वाटेने डाव्या बाजूने त्रिंगळवाडी गावाकडून इगतपुरीला पोचण्याऐवजी समोरची दक्षिण दिशेने फारसा चढ उतार नसलेली चांगली पायवाट धरायची. या वाटेने दिड तासात आपण इगतपुरीच्या विपश्‍यना मंदिराच्या मागील बाजूस पोचतो. इथून पंधरा मिनिटांत इगतपुरी स्टेशन किंवा एस. टी. स्टॅन्ड गाठून मुंबईला परता.


Regards,
Shri Siddheshwar Trekking Club
Pune, Nashik, Mumbai